पुण्यात पावसाचा कहर !
पुण्यात धडकी भरवणारा पाऊस! अनेक ठिकाणी पूरस्थिती, नागरिकांना घरातून बाहेर पडण्यास बंदी!
पुणे, २५ जुलै २०२४ :
पुण्यात गेल्या २४ तासांपासून मुसळधार पाऊस होत आहे. हवामान विभागाने येत्या काही तासात पुणे शहर आणि घाट क्षेत्रात मुसळधार पावसाचा इशारा दिला असल्याने भोर, वेल्हा, मावळ, मुळशी, हवेली तालुक्यातील खडकवासला परिसर आणि पुणे शहरातील सर्व शाळा आज (25 जुलै) रोजी बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. सुहास दिवसे यांनी दिले आहेत. या पावसामुळे अनेक ठिकाणी पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक गाड्या आणि घरे पाण्यात बुडाली आहेत. नागरिकांना घरातून बाहेर न पडण्याचा इशारा हवामान खात्याने दिला. पुणे शहर परिसरात काल रात्रीपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. अद्याप पाऊस सुरूच आहे. अनेक ठिकाणी पाणी साचल्याच्या घटना समोर आल्या आहेत. ताथवडे परिसरात अनेक घरात पाणी शिरलं आहे. अनेक सोसायट्यांमध्ये पाणी शिरलं आहे.
हवामान विभागाच्या मते, पुण्यात आजही मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी घरातून बाहेर न पडण्याचा आणि खबरदारी घेण्याचा सल्ला दिला जात आहे.
पावसामुळे झालेल्या नुकसानीची माहिती :
पुण्यातील निंबजनगर, खडकवासला आणि सिंहगड रस्त्यालगतच्या अनेक भागांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग होत असल्याने मुठा नदीला पुर आला आहे. अनेक गाड्या आणि घरे पाण्यात बुडाली आहेत. काही ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला आहे. शहरातील सर्व शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवण्यात आली आहेत.
नागरिकांना स्थानिक प्रशासनाकडून सूचना :
* नागरिकांनी घरातून बाहेर न पडण्याचा आणि खबरदारी घेण्याचा सल्ला दिला जात आहे. जर तुम्हाला बाहेर पडणे गरजेचे असल्यास, तर तुम्ही पावसाचा बचाव करणारे कपडे आणि छत्री यांचा वापर करा. तुम्ही पूरग्रस्त भागांमध्ये जाण्याचे टाळावे. आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी तुम्ही आपत्कालीन क्रमांकांवर कॉल करू शकता.
पुढील काही तासांमध्ये पुण्यात पावसाचा तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी खबरदारी घेण्याची आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याची विनंती केली जाते.
टिप्पण्या