..अशी बहरत गेली मायमराठी ! - डॉ. सुभाष राठोड
.jpeg)
..अशी बहरत गेली मायमराठी ! © डॉ. सुभाष राठोड, पुणे मराठी भाषा गौरव दिन विशेष... राजभाषा मराठीचा सन्मान म्हणून दरवर्षी 27 फेब्रुवारी ‘मराठी राजभाषा गौरव दिन’ म्हणून साजरा केला जातो. कवी, नाटककार, कादंबरीकार मराठी साहित्याचा मानदंड विष्णू वामन शिरवाडकर अर्थात कुसुमाग्रज त्यांना 1987 साली त्यांच्या एकूण किती कामगिरीचा गौरव म्हणून त्यांना 23 व्या ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यानंतर महाराष्ट्र शासनाने त्यांचा जन्मदिवस ‘मराठी भाषा गौरव दिन’ म्हणून जाहीर केला. मराठी भाषा गौरव दिनानिमित्त हा लेख प्रपंच.. इ. स. 11 व्या शतकाच्या आधीच शिलालेख आणि ताम्रपटांमधून मराठीची प्राचीन रूपे बहरू लागली. संतांचे अभंग, कीर्तने, भारुडे, शाहिरांचे पोवाडे, बखरी, लावणी, फटका इत्यादींनी ती सजत गेली. ‘अमृतातेही पैजा जिंकणारी’ श्रीमंत व प्रभावी असा पंधराशे वर्षांहूनही अधिक वर्षाचा जिता-जागता इतिहास आहे. मराठीतील आद्य शिलालेख म्हणजे अक्षीचा शिलालेख. हा शिलालेख शके 934 म्हणजे इ. स. 1022 मधील शिलाहार वंशीय राजा केसी देवराय यांचा पंतप्रधान भूईर्जू सेणुई त्यांच्या क...