पोस्ट्स

मार्च १६, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

बंजारा साहित्य अकादमीची स्थापना - डॉ. सुभाष राठोड

इमेज
  महाराष्ट्र राज्य संस्कृत, तेलुगू, बंगाली व गोर बंजारा साहित्य अकादमीची स्थापना करणेबाबत शासनाची मान्यता        - डॉ. सुभाष राठोड, पुणे      महाराष्ट्र शासन पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या दि. १६ मार्च २०२४ परिपत्रकानुसार संस्कृत, तेलुगू, बंगाली व गोर बंजारा साहित्य अकादमीची स्थापना करणेबाबत महाराष्ट्र राज्य शासनाने मान्यता दिली आहे. (शासन निर्णय क्रमांक : संकीर्ण -8223/ प्र.क्र. ११९/सां .का.4 - मंत्रालय मुंबई - दि. १६-०३-२०२४ )    महाराष्ट्राची राजभाषा असलेल्या मराठी भाषेला अधिक समृध्द करण्यासाठी विविध स्तरांवरुन प्रयत्न केले जातात. बहुभाषकांच्या या महाराष्ट्रात इतर भाषेतील साहित्य कृतींची भर पडावी या उद्देशाने इतर भाषेंच्या साहित्य अकादमीची स्थापना हे एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. राज्यामध्ये तेलुगू आणि बंगाली भाषिकांचे वास्तव्यही असून त्यांच्याकडून तेलुगू आणि बंगाली साहित्य अकादमीची स्थापना करण्याची सातत्याने मागणी होत होती. तद्वत: गोर बंजारा भाषिकांची देखील मोठी लोकसंख्या राज्यामध्ये असल्याने गोर बंजारा भाषेची देखील स्वतंत्र अकादम...