नवमहाराष्ट्राचे शिल्पकार : वसंतराव नाईक - डॉ. सुभाष राठोड

◆ नवमहाराष्ट्राचे शिल्पकार : वसंतराव नाईक प्रा. डॉ. सुभाष राठोड, पुणे आधुनिक महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये ज्या थोर शिल्पकारांची नावे इतिहासाच्या सुवर्ण पटलावर कोरली गेलेली आहेत, त्यात स्वतंत्र महाराष्ट्राचे तिसरे मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागते. १ जुलै ही त्यांची जयंती ‘कृषिदिन’ म्हणून साजरी केली जाते.स्वातंत्र्योत्तर काळात महाराष्ट्र घडविणारे महत्वाचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण, वसंतराव नाईक, शंकरराव चव्हाण, वसंतदादा पाटील यांच्या नावाचा अग्रक्रमाने उल्लेख केला जातो. आज महाराष्ट्राची जो काही जडणघडण झाली आहे, त्यामध्ये सदरील मुख्यमंत्र्यांचे योगदान अत्यंत महत्वपूर्ण मानले जाते. नाईक हे महाराष्ट्रातील हरितक्रांती, पंचायतराज तसेच श्वेतक्रांती व रोजगार हमी योजना यांसारख्या लोककल्याणकारी योजनांचे प्रवर्तक मानले जातात. या महनीय मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र राज्याला खऱ्या अर्थाने सुजलाम, सुफलाम केले आहे. माजी राष्ट्रपती भारतरत्न प्रणव मुखर्जी यांनी “वसंतराव नाईक हे भारत मातेचे थोर सुपूत्र आहेत.” या शब्दात ...