साक्षरता : सामाजिक परिवर्तनाचे पाऊल - डॉ. सुभाष राठोड

8 सप्टेंबर - आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन विशेष साक्षरता : सामाजिक परिवर्तनाचे पाऊल प्रा. डॉ. सुभाष राठोड, पुणे आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन हा प्रतिवर्षी ८ सप्टेंबर रोजी साजरा केला जातो. कोणत्याही देशाच्या विकासासाठी अधिकाधिक नागरिकांनी साक्षर होणे आवश्यक आहे. आंतरराष्ट्रीय साक्षरता दिनाची सुरुवात १९६६ मध्ये युनेस्को (UNESCO) या संयुक्त राष्ट्रांच्या शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संस्थेच्या प्रयत्नांनी झाली. युनेस्कोने ८ सप्टेंबर १९६६ रोजी आयोजित केलेल्या जागतिक परिषदेत साक्षरतेच्या महत्त्वाबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी आणि सर्वांगीण साक्षरता प्रसाराच्या उद्देशाने हा दिवस साजरा करण्य...