गुरुपौर्णिमा : ज्ञानाचा आणि कृतज्ञतेचा उत्सव

21 जुलै 2024 – गुरुपौर्णिमा विशेष गुरुपौर्णिमा : ज्ञानाचा आणि कृतज्ञतेचा उत्सव ◆ प्रा . डॉ. सुभाष राठोड , पुणे “ गुरुर्ब्रम्हा, गुरुर्विष्णु, गुरुर्देवो महेश्वरः। गुरु साक्षात् परब्रम्ह, तस्मै श्री गुरवे नमः।।“ आपल्या हिंदू दिनदर्शिकेनुसार, आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेच्या दिवशी ‘गुरुपौर्णिमा’ हा उत्सव साजरा केला जातो. जो ‘व्यास पौर्णिमा’ म्हणूनही ओळखला जातो. गुरु पौर्णिमा ऋषी वेदव्यास यांच्या जयंतीनिमित्त साजरी केली जाते, या दिवशी, महर्षी वेद व्यास यांचा जन्म झाला असे मानले जाते. ते हिंदू धर्मातील सर्वात महान गुरुंपैकी आद्यगुरू मानले जातात . त्यांनी महाभारत , वेदांची सूत्रबद्ध विभागणी, ब्रम्हसूत्रे , आणि अनेक पुराणे लिहिली असे मानले जाते. गुरुचे आपल्या जीवनात महत्त्व आजही अतुलनीय आहे. हा दिवस ज्ञान, शिक्षण आणि गुरू यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे. आपल्य...