पोस्ट्स

मार्च ५, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे
इमेज
 उच्च माध्यमिक शिक्षणाची त्रिशंकू अवस्था        कस्तुरीरंगन समितीने सुचवलेल्या आकृतिबंधातील शेवटचा स्तर म्हणजे नववी ते बारावीपर्यंतचे सलग चार वर्षांचे माध्यमिक शिक्षण. उच्च माध्यमिक शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालये या संकल्पना रद्द करण्याची शिफारसही समितीने केली होती आणि या शिफारशीमुळे विशेषत: महाराष्ट्राच्या शिक्षणक्षेत्रात संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. याचे कारण बहुतेक राज्यांत अकरावी-बारावीचे वर्ग माध्यमिक शाळांना जोडलेले आहेत, पण महाराष्ट्रात मात्र हे वर्ग माध्यमिक शाळांत, महाविद्यालयांत आणि स्वतंत्र कनिष्ठ महाविद्यालयांच्या स्वरूपात, असे तीन ठिकाणी विखुरलेले आहेत.      अकरावी-बारावीचे वर्ग सरसकट माध्यमिक शाळांत स्थलांतरित करायचे झाले तर महाविद्यालयांत आणि स्वतंत्र कनिष्ठ महाविद्यालयांत अतिरिक्त ठरणाऱ्या शिक्षकांचे काय होईल? या संस्थांत जादा होणाऱ्या आणि माध्यमिक शाळांत नव्याने निर्माण कराव्या लागणाऱ्या भौतिक आणि शैक्षणिक सुविधांचे काय करणार? यासाठी लागणाऱ्या आर्थिक तरतुदीचे काय? दहावी आणि बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा कशा होतील? असे प्रश...