पोस्ट्स

सप्टेंबर ४, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

आजच्या शिक्षणातील नवी आव्हाने - प्रा. डॉ. सुभाष राठोड

इमेज
  ५ सप्टेंबर - शिक्षक दिन विशेष.. . आजच्या शिक्षणातील नवी आव्हाने -  प्रा. डॉ. सुभाष राठोड, पुणे    आपल्या भारतात दरवर्षी ५ सप्टेंबरला 'शिक्षक दिन' साजरा केला जातो. यामागे एक महत्त्वपूर्ण इतिहास आहे. भारतात हा शिक्षक दिन भारतरत्न डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने साजरा केला जातो. डॉ. राधाकृष्णन हे एक महान शिक्षक, तत्त्वज्ञ, आणि भारताचे दुसरे राष्ट्रपती होते. त्यांनी शिक्षणाच्या क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिले आणि त्यांच्या विद्यार्थ्यांसाठी ते प्रेरणास्त्रोत होते. १९६२ मध्ये, डॉ. राधाकृष्णन राष्ट्रपती झाले. त्यावेळी त्यांच्या काही विद्यार्थ्यांनी आणि मित्रांनी त्यांचा जन्मदिवस साजरा करण्याची विनंती केली. त्यावर त्यांनी उत्तर दिले की, “माझा जन्मदिवस वेगळ्या पद्धतीने साजरा करण्याऐवजी तो ‘शिक्षक दिन’ म्हणून साजरा केला गेला तर मला आनंद होईल.” त्यांच्या या विनंतीला मान देऊन ५ सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला गेला.    आपल्या संस्कृतीत आई-वडिलांनंतर दुसरं महत्त्वाचं स्थान जर कोणाचं असेल ते गुरूचे अर्थात शिक...