लोकशिक्षक संत गाडगे महाराज - डॉ. सुभाष राठोड

आधुनिक भारताचे महान संत आणि समाज सुधारक डेबूजी झिंगराजी जाणोरकर ज्यांना गाडगेबाबा किंवा संत गाडगे महाराज या नावाने देखील ओळखले जाते. गाडगेबाबा महाराष्ट्रातील एक कीर्तनकार, संत आणि समाजसुधारक होते. आपल्या आयुष्यात त्यांनी अनेक गावामध्ये भटकंती केली. समाज सुधारणा, शिक्षण आणि स्वच्छता या विषयामध्ये त्यांची विशेष रुची होती गाडगे महाराज हे थोर समाजसुधारक होते, ज्यांनी वंचित आणि निराधारांमधील अज्ञान, अंधश्रद्धा आणि घाण दूर करण्यासाठी लढा दिला. दुर्बल, निराधार, अनाथ, अपंग यांना मदत करणारे अद्भूत संत गाडगेबाबा म्हणतात, “तीर्थी धोंडापाणी देव रोकडा सज्जनी.” मंदिरात जाऊ नका, मूर्तीपूजा करू नका, पगारी सावकारांकडून पैसे घेऊ नका, काटकसरीने वागू नका, देवदेवस्की, पोथी-पुराण, मंत्र-तंत्र, किंवा चमत्कारांवर विश्वास ठेवू नका. आयुष्यभर त्यांनी इतरांना शिकवले. माणसात देव शोधणाऱ्या या संताने संपूर्ण महाराष्ट्रात अनाथाश्रम, आश्रम, विद्यालये, धर्मशाळांची स्थापना केली. दुर्बल, अपंग, अनाथ हे त्यांचे रंजले-गांजले आणि दिनाचे दैवत होते. गाडगे महाराजांचे विचार : गाडगे महाराजा...