पोस्ट्स

मार्च २, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

संत सेवालाल महाराज बंजारा-लमाण तांडा समृद्धी योजना

इमेज
  संत सेवालाल महाराज बंजारा-लमाण तांडा समृद्धी योजना :     आजही महाराष्ट्रातील सुमारे २० ते २५ लाख बंजारा-लमाण समाजाचा अपेक्षित विकास झालेला नाही. या समाजाला विकासाच्या मूळ प्रवाहात आणून त्याचे राहणीमान उंचावणे, उत्पन्नाचे स्रोत वाढावेत आणि स्थिरता प्राप्त करून आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण बनविण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने संत सेवालाल महाराज बंजारा-लमाण तांडा समृद्धी योजना सुरू करण्यात आली आहे.  योजनेचा उद्देश :     राज्यातील बंजारा आणि लमाण समाजाच्या तांड्यांमध्ये मूलभूत सुविधा आणि विकासासाठी प्रोत्साहन देणे. योजनेची वैशिष्ट्ये : ● तांड्यांना गावठाण आणि महसूल गावचा दर्जा देणे.   ● स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापन करण्यासाठी अंतराची अट शिथिल करणे. ● प्रत्येक तांड्याला ३० लाख रुपये पर्यंत निधी उपलब्ध करून देणे. ● पाणीपुरवठा, वीज, रस्ते, आरोग्य, शिक्षण, स्वच्छता इत्यादी सुविधांसाठी निधी. ● तांड्यांमधील तरुणांसाठी कौशल्य विकास आणि रोजगार निर्मिती कार्यक्रम. ● बंजारा आणि लमाण समाजाच्या सांस्कृतिक वारशाचे जतन आणि संवर्धन. योजनेचा लाभ : ...