पोस्ट्स

फेब्रुवारी २५, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

मराठी भाषा‌ दिन : भाषा आणि संस्कृतीचा गौरव - डॉ. सुभाष राठोड

इमेज
मराठी भाषा‌ दिन : भाषा आणि संस्कृतीचा गौरव                   ● प्रा. डॉ. सुभाष राठोड, पुणे (रयत सेवक)    दरवर्षी २७ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्राचे ज्येष्ठ कवी विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवशी साजरा करण्यात येतो. मराठी साहित्याचा मानदंड कुसुमाग्रज यांनी मराठी भाषेला सन्मान मिळवून देण्यासाठी आयुष्यभर प्रयत्न केले. कुसुमाग्रज महाराष्ट्राचे लाडके साहित्यकार, ज्ञानपीठ पुरस्कार विजेते, थोर लेखक, नाटककार म्हणून ओळखले जातात. १९८७ साली त्यांना त्यांच्या एकूण साहित्य सेवेसाठी ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला. भाषा मरता देशही मरतो, संस्कृतीचा मग दिवा विझे, असे कवी कुसुमाग्रज उर्फ विष्णू वामन शिरवाडकर यांनी लिहून ठेवले आहे. "माझी मराठी, मायबोली, सदैव तुझीच पूजा करी" असे म्हटले जाते. मराठी भाषा ही केवळ भाषेचा प्रकार नाही तर ती एक संस्कृती, एक वारसा आहे. मराठी भाषा गौरव दिन हा आपल्या समृद्ध भाषेचा आणि साहित्यिक परंपरेचा गौरव करण्याचा दिवस आहे. हा दिवस आपल्याला मराठी भाषेचे महत्त्व जाणून घेण्यास आणि ती जपण्यासाठी प्रेरणा देतो. मरा...