पोस्ट्स

सप्टेंबर १३, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

राष्ट्रभाषा हिंदी : संवादाचा सेतू - प्रा. डॉ. सुभाष राठोड, पुणे

इमेज
राष्ट्रभाषा हिंदी : संवादाचा सेतू                   ◈ प्रा. डॉ. सुभाष राठोड, पुणे भा रतात दरवर्षी १४ सप्टेंबर हा दिवस 'हिंदी भाषा दिवस’ म्हणून साजरा केला जातो. प्रत्येक राष्ट्राची एक विशेष भाषा असते, जी त्या राष्ट्राच्या संस्कृतीची, अस्मितेची, आणि अभिव्यक्तीची परिभाषा बनते. हिंदी भाषा ही आपल्या भारताच्या विविधतेतील एकतेचे सर्वोत्तम उदाहरण आहे. भाषिक विविधतेने नटलेल्या आपल्या देशाला एकसूत्रात बांधण्याचे कार्य हिंदी भाषेने   निश्चितच केले आहे.  भारताच्या संदर्भात, हिंदी ही फक्त एक भाषा नाही, तर ती आपल्या संस्कृतीचे एक महत्त्वपूर्ण द्योतक आहे. हिंदी भाषेचा प्रचार-प्रसार भारतीय स्वातंत्र्यलढ्यातही महत्त्वाचा होता. महात्मा गांधींनी हिंदीला जनतेची भाषा म्हटले होते, कारण ती सामान्य माणसांपर्यंत पोहोचणारी आणि त्यांच्यात एकजूट निर्माण कर ण्याची भाषा प्रचंड शक्ती होती . आधुनिक भारतात हिंदीचे महत्त्व दिवसेंदिवस वाढत आहे. सरकारी कामकाज, शिक्षण, साहित्य, चित्रपट, आणि प्रसार माध्यमे या सर्वच क्षेत्रात हिं दी भाषेची महत्त्वपूर्ण भूमिका राहिल...