बंजारा साहित्य अकादमीची स्थापना - डॉ. सुभाष राठोड


 महाराष्ट्र राज्य संस्कृत, तेलुगू, बंगाली व गोर बंजारा साहित्य अकादमीची स्थापना करणेबाबत शासनाची मान्यता

       - डॉ. सुभाष राठोड, पुणे 

    महाराष्ट्र शासन पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या दि. १६ मार्च २०२४ परिपत्रकानुसार संस्कृत, तेलुगू, बंगाली व गोर बंजारा साहित्य अकादमीची स्थापना करणेबाबत महाराष्ट्र राज्य शासनाने मान्यता दिली आहे. (शासन निर्णय क्रमांक : संकीर्ण -8223/ प्र.क्र. ११९/सां .का.4 - मंत्रालय मुंबई - दि. १६-०३-२०२४ )

   महाराष्ट्राची राजभाषा असलेल्या मराठी भाषेला अधिक समृध्द करण्यासाठी विविध स्तरांवरुन प्रयत्न केले जातात. बहुभाषकांच्या या महाराष्ट्रात इतर भाषेतील साहित्य कृतींची भर पडावी या उद्देशाने इतर भाषेंच्या साहित्य अकादमीची स्थापना हे एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. राज्यामध्ये तेलुगू आणि बंगाली भाषिकांचे वास्तव्यही असून त्यांच्याकडून तेलुगू आणि बंगाली साहित्य अकादमीची स्थापना करण्याची सातत्याने मागणी होत होती. तद्वत: गोर बंजारा भाषिकांची देखील मोठी लोकसंख्या राज्यामध्ये असल्याने गोर बंजारा भाषेची देखील स्वतंत्र अकादमीची मागणी होत होती. त्यानुषंगाने महाराष्ट्र राज्य गोर बंजारा साहित्य अकादमीची महाराष्ट्र शासनाने मान्यता दिली आहे. मा.मुख्यमंत्री व मा.उपमुख्यमंत्री यांनी पोहरादेवी येथे गोर बंजारा समाजासाठी स्वतंत्र साहित्य अकादमी स्थापन करण्यात येईल अशी घोषणा केली होती. या तीनही भाषांचे साहित्यिक संपन्नता व ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेता महाराष्ट्र राज्य तेलुगू साहित्य अकादमी, महाराष्ट्र राज्य बंगाली साहित्य अकादमी आणि महाराष्ट्र राज्य गोर बंजारा

साहित्य अकादमीची स्थापना होणे आवश्यक होते.

 ◆ अशी असेल विविध साहित्य अकादमीची रचना :

▪️अध्यक्ष - मा. मंत्री, सांस्कृतिक कार्य

▪️शासकीय सदस्य - अपर मुख्य सचिव/प्रधान सचिव/सचिव सांस्कृतिक कार्य

▪️शासकीय सदस्य - सहसचिव/ उपसचिव, सांस्कृतिक कार्य

▪️सदस्य सचिव - संचालक/सहसंचालक

▪️अशासकीय सदस्य- १ कार्याध्यक्ष आणि इतर १० अशासकीय सदस्य असे एकूण ११ अशासकीय सदस्य. या सदस्यांपैकी किमान 30% सदस्य मराठी साहित्य क्षेत्रातील असतील.

.▪️कार्यकारी समिती ::-

१. कार्याध्यक्ष – अध्यक्ष

२. समितीतील अशासकीय सदस्य – सदस्य

३. संचालक/सहसंचालक – सदस्य सचिव

▪️ कार्यकारी समितीची कार्यकक्षा :-

अकादमीच्या विविध योजना, पुरस्कार, कार्यक्रम रुपरेषा ठरविणे, साहित्यिक

अदान-प्रदान बाबत उपाययोजना, अनुदान वाटपाबाबत कार्यवाही इत्यादी यांची

अंमलबजावणीसंबंधी नियय कार्याध्यक्षांच्या अध्यक्षतेखालील कार्यकारी सहमतीव्दारे घेण्यात

येतील.

▪️ कार्यकाल :-

अशासकीय सदस्यांच्या नियुक्तीचा कालावधी नियुक्ती पासून सर्वसाधारणपणे 3 वषे राहील. तथापि, त्यापूर्वी सदर नियुक्त्या रद्द करण्याचे अधिकार शासनास असतील. अशासकीय सदस्यांच्या नियुक्त्या रद्द झाल्यावरही, शासकीय सदस्य कार्यरत असल्याने अकादमीचे अस्तित्व कायम राहील.

◆ साहित्य अकादमींची उद्दिष्टे :-

१. राज्यातील बहुभाषिकांच्या म्हणजेच मराठी भाषिकांच्या संस्कृती, साहित्य, भाषा व

लोकजीवनाशी सुसंवाद साधून सांस्कृतिक सुसंवाद निर्माण करण्याची कला या भाषिक अल्पसंख्यांकांना अवगत व्हावी.

२. संस्कृत, तेलुगू, बंगाली व गोर बंजारा भाषा, साहित्य, कला व संस्कृती यांचे जतन

व संवर्धन करणे.

३. संस्कृत, तेलुगू, बंगाली व गोर बंजारा भाषा, साहित्य आणि कला क्षेत्रातील व्यक्तींना पुरस्कृत करणे.

४. संस्कृत, तेलुगू, बंगाली व गोर बंजारा भाषेच्या विकास व संवर्धनासाठी प्रोत्साहन देणे.

५. संस्कृत, तेलुगू, बंगाली व गोर बंजारा भाषेतील वाड्.मयीन कृती प्रकाशित करण्यात सहाय्य करणे.

६. मराठी आणि संस्कृत, तेलुगू, बंगाली व गोर बंजारा या भाषांमध्ये साहित्यिक कल्पनांची देवाणघेवाण करणे.

७. संस्कृत, तेलुगू, बंगाली व गोर बंजारा अशा भाषिक अल्पसंख्याकांनी केवळ त्यांच्या भाषेतील कार्यक्रम आयोजित करुन मर्यादीत सामाजिक सुसंवाद ठेवण्याऐवजी त्यांच्या भाषेतील कार्यक्रमांसोबतच मराठी भाषिक कार्यक्रमांचे आयोजन करुन त्यामध्ये मराठी भाषिकांनाही सहभागी करुन सामाजिक सुसंवाद निर्माण करणे.

८. संस्कृत, तेलुगू, बंगाली व गोर बंजारा या भाषेसोबतच मराठी भाषेतही परिसंवाद,

चचासत्रे, कविसंमेलने यासारखे साहित्यिक तसेच सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करणे.

९. संस्कृत, तेलुगू, बंगाली व गोर बंजारा सोबतच मराठी भाषिकांच्या लोककलांची संमेलने आयोजित करणे.

◆ अ) पुरस्कार :-

१. जीवन गौरव पुरस्कार :- संस्कृत, तेलुगू, बंगाली व गोर बंजारा कला, संस्कृती आणि साहित्य क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या प्रत्येक भाषेतील एका व्यक्तीस दरवषी त्यांच्या योगदानाबद्दल‌ “जीवन गौरव पुरस्कार” प्रदान करुन गौरविण्यात येईल.

पुरस्काराचे स्वरुप :* प्रत्येकी रु .1 लाख, मानचिन्ह, मानपत्र, शाल व श्रीफळ

असे या पुरस्काराचे स्वरुप असेल.

२. साहित्य पुरस्कार:- संस्कृत, तेलुगू, बंगाली व गोर बंजारा भाषा आणि

साहित्याशी संबंधित चार वेगवेगळ्या वाड्.मय प्रकारातील साहित्यिकांच्या पुस्तकांना पुरस्कार देऊन गौरविण्यात येईल. पुरस्काराचे स्वरुप : प्रत्येकी रु. 51,000/-, मानचिन्ह, मानपत्र, शाल व श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरुप असेल.

३. कला पुरस्कार :- संस्कृत, तेलुगू, बंगाली व गोर बंजारा भाषेतील कला, लोककला इत्यादी क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या एका व्यक्तीस दरवषी त्यांच्या या क्षेञातील योगदानाबद्दल कला पुरस्काराने गौरविण्यात येईल. पुरस्काराचे स्वरुप :* प्रत्येकी रु.51,000/-, मानचिन्ह, मानपत्र, शाल व श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरुप असेल.

४. नवोदित लेखक/ कवी/ साहित्यिक पुरस्कार : संस्कृत, तेलुगू, बंगाली व गोर बंजारा भाषा व साहित्य क्षेत्रातील एका नवोदित लेखकास या पुरस्काराने गौरविण्यात येईल. पुरस्काराचे स्वरुप :-* प्रत्येकी रु.51,000/-, मानचिन्ह, मानपत्र, शाल व श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरुप असेल.

५. अनुवाद पुरस्कार :- साहित्यिक कल्पनांची देवाणघेवाण अंतर्गत मराठीमधून संस्कृत, तेलुगू, बंगाली व गोर बंजारा या भाषांमध्ये अनुवाद करणाऱ्या साहित्यकारांना दरवषी या विशेष पुरस्काराने गौरविण्यात येईल. पुरस्काराचे स्वरुप :-* प्रत्येकी रु .51,000/- मानचिन्ह, मानपत्र, शाल व श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरुप असेल.

◆ (ब) अनुदान :- १.पुस्तकांच्या प्रकाशनासाठी अनुदान:- या योजनेअंतर्गत संस्कृत, तेलुगू, बंगाली व गोर बंजारा भाषेतील पुस्तकांच्या प्रकाशनासाठी प्रत्येकी कमाल रु.25,000/- अनुदान देण्यात येईल. यासाठी लेखकांकडून अर्ज मागवून अकादमीच्या समितीमार्फत पुस्तकांची निवड करण्यात येईल. प्रत्येक अकादमीसाठी सदर प्रकाशन संख्या त्या-त्या आर्थिक वर्षातील उपलब्ध निधीच्या अधीन असेल.

१. अनुवादासाठी प्रोत्साहनात्मक अनुदान:- या योजनेंतगयत मराठी व संस्कृत,

तेलुगू, बंगाली आणि गोर बंजारा भाषांमध्ये साहित्यिक अदान-प्रदान होण्याच्या दृष्टीने मराठी भाषेतील उत्कृष्ट साहित्यकृतींचा संस्कृत, तेलुगू, बंगाली व गोर बंजारा भाषेत अनुवाद करण्यासाठी प्रती शब्द रुपये २.००/- प्रमाणे प्रोत्साहनात्मक अनुदान देण्यात येईल.

◆ (क) साहित्यिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम :- महाराष्ट्रातील ज्या शहरांमध्ये संस्कृत, तेलुगू, बंगाली व गोर बंजारा भाषिक समुदाय मोठ्या प्रमाणात राहतो,अशा शहरांमध्ये संस्कृत, तेलुगू, बंगाली व गोर बंजारा सोबतच मराठी भाषेतील परिसंवाद, चचासत्रे, संगोष्ट्ठी, कार्यशाळा, कवीसंमेलने यासारखे साहित्यिक कार्यक्रम तसेच या भाषेंमधील लोकसाहित्य, लोकगीत आणि लोककला यावर आधारित सांस्कृतिक कार्ययक्रमांचे आयोजन करण्यात यावे. यासाठीचा खर्च महाराष्ट्र राज्य संस्कृत साहित्य अकादमी, महाराष्ट्र राज्य तेलुगू साहित्य अकादमी, महाराष्ट्र राज्य बंगाली साहित्य अकादमी आणि महाराष्ट्र राज्य गोर बंजारा साहित्य अकादमी यांना त्या-त्या वषी मंजूर होणाऱ्या अर्थसंकल्पीय तरतूदीतून भागविण्यात यावा.

संदर्भ :- महाराष्ट्र शासन परिपत्रक दि. १६-०३-२०२४


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

AI क्रांती : नव्या जगाचा उदय - डॉ. सुभाष राठोड

गुरुपौर्णिमा : ज्ञानाचा आणि कृतज्ञतेचा उत्सव

युगप्रवर्तक : डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील - डॉ. सुभाष राठोड

..अशी बहरत गेली मायमराठी ! - डॉ. सुभाष राठोड

आजच्या शिक्षणातील नवी आव्हाने - प्रा. डॉ. सुभाष राठोड

शिक्षणात मराठी : आव्हाने आणि उपाय - डॉ. सुभाष राठोड

मराठी भाषा‌ दिन : भाषा आणि संस्कृतीचा गौरव - डॉ. सुभाष राठोड

राष्ट्रभाषा हिंदी : संवादाचा सेतू - प्रा. डॉ. सुभाष राठोड, पुणे

समतेचे दीपस्तंभ : छत्रपती शाहू महाराज ● प्रा. डॉ. सुभाष राठोड, पुणे

साक्षरता : सामाजिक परिवर्तनाचे पाऊल - डॉ. सुभाष राठोड