पोस्ट्स

युगप्रवर्तक : डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील - डॉ. सुभाष राठोड

इमेज
२२ सप्टेंबर - डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील जयंती विशेष …  शैक्षणिक क्रांतीचे युगप्रवर्तक   :  कर्मवीर भाऊराव पाटील                                                                            ◆  प्रा. डॉ. सुभाष राठोड     थोर समाजसुधारक, शिक्षणतज्ज्ञ, रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक, पद्मविभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांची आज (22 सप्टेंबर) 137 वी जयंती. जयंतीनिमित्त त्यांच्या विचार आणि कार्याचे केलेले चिंतन.. पुरोगामी महाराष्ट्राच्या भूमीला वेगळा आणि प्रगतशील असा इतिहास आहे. महाराष्ट्र भूमीला जसा पराक्रमाचा वारसा आहे, तसा थोर महात्म्यांच्या विचारांचा, कार्याचा गंधही आहे. कोणी त्याला ‘संतांची भूमी’ म्हणून गौरवतात तर कोणी त्यास ‘सामाजिक आणि शैक्षणिक क्रांतीकारांची भूमी’ म्हणूनही ओळखतात. सुरुवातीपासूनच महाराष्ट्र राज्याला पुरोगामी विचारांचे राज्य म्हणून गौरविले गेले आहे....

राष्ट्रभाषा हिंदी : संवादाचा सेतू - प्रा. डॉ. सुभाष राठोड, पुणे

इमेज
राष्ट्रभाषा हिंदी : संवादाचा सेतू                   ◈ प्रा. डॉ. सुभाष राठोड, पुणे भा रतात दरवर्षी १४ सप्टेंबर हा दिवस 'हिंदी भाषा दिवस’ म्हणून साजरा केला जातो. प्रत्येक राष्ट्राची एक विशेष भाषा असते, जी त्या राष्ट्राच्या संस्कृतीची, अस्मितेची, आणि अभिव्यक्तीची परिभाषा बनते. हिंदी भाषा ही आपल्या भारताच्या विविधतेतील एकतेचे सर्वोत्तम उदाहरण आहे. भाषिक विविधतेने नटलेल्या आपल्या देशाला एकसूत्रात बांधण्याचे कार्य हिंदी भाषेने   निश्चितच केले आहे.  भारताच्या संदर्भात, हिंदी ही फक्त एक भाषा नाही, तर ती आपल्या संस्कृतीचे एक महत्त्वपूर्ण द्योतक आहे. हिंदी भाषेचा प्रचार-प्रसार भारतीय स्वातंत्र्यलढ्यातही महत्त्वाचा होता. महात्मा गांधींनी हिंदीला जनतेची भाषा म्हटले होते, कारण ती सामान्य माणसांपर्यंत पोहोचणारी आणि त्यांच्यात एकजूट निर्माण कर ण्याची भाषा प्रचंड शक्ती होती . आधुनिक भारतात हिंदीचे महत्त्व दिवसेंदिवस वाढत आहे. सरकारी कामकाज, शिक्षण, साहित्य, चित्रपट, आणि प्रसार माध्यमे या सर्वच क्षेत्रात हिं दी भाषेची महत्त्वपूर्ण भूमिका राहिल...

साक्षरता : सामाजिक परिवर्तनाचे पाऊल - डॉ. सुभाष राठोड

इमेज
 8 सप्टेंबर - आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन विशेष  साक्षरता : सामाजिक परिवर्तनाचे पाऊल                                                                                                               प्रा. डॉ. सुभाष राठोड, पुणे     आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन हा प्रतिवर्षी ८ सप्टेंबर रोजी साजरा केला जातो. कोणत्याही देशाच्या विकासासाठी अधिकाधिक नागरिकांनी साक्षर होणे आवश्यक आहे. आंतरराष्ट्रीय साक्षरता दिनाची सुरुवात १९६६ मध्ये युनेस्को (UNESCO) या संयुक्त राष्ट्रांच्या शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संस्थेच्या प्रयत्नांनी झाली. युनेस्कोने ८ सप्टेंबर १९६६ रोजी आयोजित केलेल्या जागतिक परिषदेत साक्षरतेच्या महत्त्वाबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी आणि सर्वांगीण साक्षरता प्रसाराच्या उद्देशाने हा दिवस साजरा करण्य...

आजच्या शिक्षणातील नवी आव्हाने - प्रा. डॉ. सुभाष राठोड

इमेज
  ५ सप्टेंबर - शिक्षक दिन विशेष.. . आजच्या शिक्षणातील नवी आव्हाने -  प्रा. डॉ. सुभाष राठोड, पुणे    आपल्या भारतात दरवर्षी ५ सप्टेंबरला 'शिक्षक दिन' साजरा केला जातो. यामागे एक महत्त्वपूर्ण इतिहास आहे. भारतात हा शिक्षक दिन भारतरत्न डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने साजरा केला जातो. डॉ. राधाकृष्णन हे एक महान शिक्षक, तत्त्वज्ञ, आणि भारताचे दुसरे राष्ट्रपती होते. त्यांनी शिक्षणाच्या क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिले आणि त्यांच्या विद्यार्थ्यांसाठी ते प्रेरणास्त्रोत होते. १९६२ मध्ये, डॉ. राधाकृष्णन राष्ट्रपती झाले. त्यावेळी त्यांच्या काही विद्यार्थ्यांनी आणि मित्रांनी त्यांचा जन्मदिवस साजरा करण्याची विनंती केली. त्यावर त्यांनी उत्तर दिले की, “माझा जन्मदिवस वेगळ्या पद्धतीने साजरा करण्याऐवजी तो ‘शिक्षक दिन’ म्हणून साजरा केला गेला तर मला आनंद होईल.” त्यांच्या या विनंतीला मान देऊन ५ सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला गेला.    आपल्या संस्कृतीत आई-वडिलांनंतर दुसरं महत्त्वाचं स्थान जर कोणाचं असेल ते गुरूचे अर्थात शिक...

शिक्षणात मराठी : आव्हाने आणि उपाय - डॉ. सुभाष राठोड

इमेज
शिक्षणात मराठी : आव्हाने आणि उपाय                                            ⋄ डॉ. सुभाष राठोड, पुणे      मराठी भाषा आपली संस्कृती आणि ओळख आहे. ती केवळ एक विषय नाही तर आपली जीवनशैली आहे. हा समृद्ध वारसा पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहोचवणे आपले कर्तव्य आहे. मात्र, आजच्या जगात इंग्रजी भाषेचा मोठा प्रभाव वाढत असल्याने मराठी भाषेची उपेक्षा होत आहे. तंत्रज्ञानाच्या युगात नवीन शब्द आणि संकल्पना निर्माण होत असताना मराठी भाषेत त्यांचे समतुल्य शोधणे हे एक आव्हान बनले आहे. शिक्षणात तंत्रज्ञानाचा वापर करून मराठी भाषेला आधुनिक स्वरूप देणे आवश्यक आहे.    शिक्षकांची महत्त्वपूर्ण भूमिका :  ● उत्साह आणि प्रेरणा :     शिक्षक विद्यार्थ्यांमध्ये मराठी भाषेची आवड निर्माण करण्यासाठी उत्साही आणि प्रेरणादायी असले पाहिजेत.   ● विविध उपक्रम :      विद्यार्थ्यांच्या वयोगटाच्या आणि आवडीच्या आधारे विविध उपक्रम आयोजित करावेत.    ...

पुण्यात पावसाचा कहर !

इमेज
पुण्यात धडकी भरवणारा पाऊस! अनेक ठिकाणी पूरस्थिती, नागरिकांना घरातून बाहेर पडण्यास बंदी!   पुणे, २५ जुलै २०२४ :     पुण्यात गेल्या २४ तासांपासून मुसळधार पाऊस होत आहे. हवामान विभागाने येत्या काही तासात पुणे शहर आणि घाट क्षेत्रात मुसळधार पावसाचा इशारा दिला असल्याने भोर, वेल्हा, मावळ, मुळशी, हवेली तालुक्यातील खडकवासला परिसर आणि पुणे शहरातील सर्व शाळा आज (25 जुलै) रोजी बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. सुहास दिवसे यांनी दिले आहेत. या पावसामुळे अनेक ठिकाणी पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक गाड्या आणि घरे पाण्यात बुडाली आहेत. नागरिकांना घरातून बाहेर न पडण्याचा इशारा हवामान खात्याने दिला. पुणे शहर परिसरात काल रात्रीपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. अद्याप पाऊस सुरूच आहे. अनेक ठिकाणी पाणी साचल्याच्या घटना समोर आल्या आहेत. ताथवडे परिसरात अनेक घरात पाणी शिरलं आहे. अनेक सोसायट्यांमध्ये पाणी शिरलं आहे. हवामान विभागाच्या मते, पुण्यात आजही मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी घरातून बाहेर न पडण्याचा आण...

AI क्रांती : नव्या जगाचा उदय - डॉ. सुभाष राठोड

इमेज
  कृत्रिम बुद्धिमत्ता  AI    क्रांती : नव्या जगाचा उदय                                                              ⋄   प्रा .  डॉ. सुभाष राठोड ,  पुणे    या पृथ्वीतलावर केवळ मनुष्यच असा प्राणी आहे, की जो इतर प्राण्यांच्या तुलनेत बुद्धिमान समजला जातो. ज्या प्राण्यांमध्ये किंवा मनुष्यांमध्ये विचार करण्याची क्षमता असते त्यांना बुद्धिमान म्हटले जाते. अनेक प्राण्यांमध्ये बुद्धिमत्तेचे लक्षणे दिसून येतात, परंतु विवेकबुद्धी हा गुण केवळ मनुष्यामध्येच आढळतो म्हणून  मनुष्य बुद्धिमान समजला जातो.  आजच्या काळात तंत्रज्ञानाने अतोनात प्रगती केली आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून कृत्रिम बुद्धिमत्ता यासारख्या तंत्रज्ञानाचा उदय झाला आहे. आजच्या युगात, तंत्रज्ञान आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनले आहे. अनेक क्षेत्रात प्रगती झाली आहे, तरीही अनेक आव्हाने आहेत. या आव्हानांना तोंड देण्यासाठी आणि आपल्या...